करोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. मागील काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टरांशी संवाद साधला होता. उद्या (रविवार १६ मे) दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार असून हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/  आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/7dH0X0FTCpc उद्या दुपारी १२ वाजता पहावयास मिळणार आहे.

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावरून देखील याचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन करोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorrow the task force will interact with doctors across the state on the topic of treatment of corona from primary health centers msr
First published on: 15-05-2021 at 21:55 IST