मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

१. माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद
माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली असून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असून धुके आणि पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. वाचा सविस्तर

२. अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता डेव्हिड हेडलीचा भाऊ
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानहून आलेल्या शिष्टमंडळात मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचा भाऊ दानयाल गिलानीदेखील सहभागी होते.
वाचा सविस्तर

३. स्फोटके, शस्त्रांसाठी पांगारकरचा पैसा
नालासोपारा आणि पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना स्फोटके, शस्त्रे खरेदी करण्यासाठी श्रीकांत पांगारकरने पैसा पुरवल्याचे राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) चौकशीतून स्पष्ट झाले आहे. पांगारकरने स्वत:हून संशयित अतिरेक्यांना पैसे पुरवले की, कोणाच्या सांगण्यावरून, याचा तपास एटीएस करीत आहे.
वाचा सविस्तर 

४. ‘प्लेबॉय’ची फसवणूक उघड
नवनवीन मुली व महिलांसोबत रात्र घालवून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या ठाणे येथील टोळीला गजाआड करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील पाच सदस्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून पुरुष आरोपी हा मुख्य सूत्रधार आहे.
वाचा सविस्तर 

 

५. Kerala Flood: पीडितांना फेकून बिस्किट वाटणाऱ्या मंत्री महोदयांवर टीकेची झोड
केरळमधील पूरग्रस्तांना फेकत बिस्किटं वाटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील मंत्री एच डी रेवन्ना यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. हसन जिल्ह्यातील मदत छावणीत गेले असता एच डी रेवन्ना यांनी तेथील लोकांना खाण्यासाठी बिस्किटं वाटली. मात्र ते ज्याप्रकारे वाटत होते त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. रेवन्ना हे विकास मंत्री असून मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे बंधू आहेत.
वाचा सविस्तर