महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियावरील ट्रोलिंगच्या विषयावर आपलं मत मांडलं. ते ‘कोलाज विथ राजू परुळेकर’ मुलाखतीत बोलत होते. मुलाखतकार राजू परुळेकर यांनी त्यांना तुम्ही अलीकडे सोशल मीडियावर अकाऊंट ब्लॉक करता असा प्रश्न विचारला.

आणखी वाचा- “जेव्हा कुणाला माहिती नव्हतं तेव्हा मुख्यमंत्री झालो, पण…”; फडणवीसांनी व्यक्त केली सल

त्यावर त्यांनी “आम्ही कोणालाही ब्लॉक करत नाही पण ट्रोलिंगमध्ये एक सभ्यता असली पाहिजे. विचारांनी विचारांना ट्रोल करा. मला ते मान्य आहे. पण फेक अकाऊंटच्या माध्यमातून चांगलं बोललं तरी शिव्या दिल्या जातात, वाईट लिहिल जातं. ही संस्कृती नाही” असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

आणखी वाचा- …तरच भाजपाला राज ठाकरेंसोबत जाणं शक्य; फडणवीसांचा सूचक इशारा

सोशल मीडियावर दीडलाख फेक अकाऊंटस असल्याचा त्यांनी दावा केला. सोशल मीडियावर काँग्रेसचे फार अकाऊंट नाहीत पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रचंड अकाऊंट तयार केले आहेत. एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोकसंवेदना प्रगट केल्यानंतरही फेक अकाऊंटच्या माध्यमातून ट्रोलिंग केले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. टि्वटर, फेसबुकवरील फिल्टर्सचा वापर केल्यानंतर फेकअकाऊंटस कुठले? ते आम्हाला समजले. ट्रोलिंग केले जात असेल तर आम्हाला आमच्या बचावासाठी उत्तर द्यावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. कारण सामान्य माणसाला फेक अकाऊंट कुठले ते माहित नाहीय.