नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता एस. रामास्वामी हे आयुक्त होणार आहेत. मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केला होता. तेव्हापासून मुंढे हे चर्चेत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली टाळली होती. त्यांची बदली आता झाली आहे. त्यांची बदली कुठे झाली आहे हे अद्याप समजले नाही. एस. रामास्वामी हे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते. आपत्ती निवारण, महसूल आणि वन विभाग, मंत्रालयाचे संचालक एस. के. दिवसे यांची बदली भंडाऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची बदली कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली होती. त्यांच्या या कडक शिस्तीमुळे सर्वांचे धाबे दणाणले होते. त्यांच्याविरोधात नगरसेवक तक्रारी करू लागले होते. तुकाराम मुंढे हे आम्हाला योग्य तो सन्मान देत नाहीत अशी ओरड होऊ लागली होती. एरवी ज्या नगरसेवकांमध्ये कोणत्याच बाबतीत एकमत होत नाही त्यांचे तुकाराम मुंढेंविरोधात एकमत झाले आणि त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला इतकेच नव्हे तर तो मंजूरही झाला होता. पंरतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंढे यांना या पदावरुन हटवले जाणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या घटनेला पाच महिने लोटल्यानंतर मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती कुठे करण्यात आली आहे हे अद्याप समजले नाही.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन
satej patil , raju shetty
साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली