सज्जनगडहून दुचाकीवरून परतताना अनिकेत संजय मोरे (वय २०, रा. जकातवाडी), अक्षय रमेश माने (वय १८, रा. डबेवाडी) यांचा अपघाती मृत्यू झाला.
पोलीस सूत्रानुसार कॉलेजला सुटी असल्याने अनिकेत व अक्षय हे मित्र दुचाकीवरून सज्जनगडला गेले होते. बारावीची परीक्षा संपल्यामुळे मित्रपरिवारासमवेत सज्जनगडावरील मठामध्ये प्रसाद घेऊन ते साता-याकडे येत होते. अनिकेत दुचाकी चालवत होता तर अक्षय मागे बसला होता. त्याच वेळी परळीकडून निघालेल्या मोटारची भोंदवडे फाटा येथे दुपारी दोनच्या सुमारास धडक झाली. यामध्ये दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. जकातवाडी व डबेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेत व अक्षय हे दोघे शिक्षण घेत असल्यापासूनचे मित्र होते. अनिकेत येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होता. काही वर्षांपूर्वीच अनिकेतच्या वडिलांचा मृत्यू झाला होता व तो आईसमवेत आपल्या मामाकडे जकातवाडीस राहात होता.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
US Influencer killed husband children
महिला ज्योतिष एन्फ्लुएन्सरने पती अन् मुलांचा खून करून स्वतःला संपवलं, सूर्यग्रहण ठरलं निमित्त
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू