News Flash

वाशिष्ठी नदीला पूर; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूणमध्ये काही ठिकाणी पाणी भरले

रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं आहे. काल चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आला होता. वाशिष्ठी नदीचे पाणी थेट चिपळूण शहरात शिरलं होतं चिपळूणच्या अनेक भागांमध्ये पाणी आले होते चिंचनाका परिसरात तर 3 फूट पाणी होते. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ही स्थिती तयार झाली कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग व काल रात्रभर कोसळणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसले असून बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. पूजा टॉकिजपर्यंत पाणी आहे. बाजारपूल पाण्याखाली गेला आहे.

चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहेत.

सांस्कृतिक केंद्राला पुराचा वेढा पडला आहे. वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 10:40 am

Web Title: vashishti river overflow ratnagiri rain nck 90
Next Stories
1 गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यासह १०० गावांचा संपर्क तुटला!
2 विरोधकांनी बिळात न बसता पीपीई कीट घालून करोना वॉर्डात जाऊन यावं : हसन मुश्रीफ
3 अलिबागमध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन यंदा नगरपालिकेकडून
Just Now!
X