• रायगड जिल्हा परिषदेचा पथदर्षी प्रकल्प
  • लोकसहभागातून २ हजार ८०४ वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम

विकेंद्रीत जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने लोकसहभागातून जलसंवर्धन चळवळ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत लोकसहभागातून तब्बल २ हजार ८०४ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यामध्ये १२६.१८ घनमिटर जलसाठा सध्या साठला आहे.

कोकणात दरवर्षी पडणाऱ्या पावसाचा विचार केल्यास, संपुर्ण राज्याला वर्षभर पाणी पुरवठा करता येईल. येवढा पाऊस एक टय़ा कोकणात पडतो. पण योग्य नियोजनाअभावी हे स’ााद्रीच्या पर्वतरांगावरून घसरत थेट  समुद्राला जाऊन मिळते. पावसाळ्यात दुथडीभरून वाहणाऱ्या नद्या कोरडय़ा पडतात. आणि गाव, वाडय़ा वस्त्यांवर पाणी समस्या निर्माण होते. कोकणातील पाणी समस्येची कारणे आणि उपाय योजना याचा अभ्यास करण्यासाठी जलपुरूष राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक जलपरिक्रमा काढण्यात आली. यातूनच कोकणात विकेंद्रीत जलव्यवस्थापनची गरज प्रकर्षांने समोर आली होती.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने यावर्षी लोकसहभागातून जलसवंर्धनाची चळवळ राबविण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाब म्हणजे स्थानिकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून जिल्’ाात आतापर्यंत २ हजार ८०४ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यात जवळपास १२६.१६ घनमिटर जलसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे ही कामे लोकसहभागातून केल्याने शासनाचा जवळपास १५ कोटी ४२ लाख ५ हजार रुपयांच्या निधीची बचत झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत आणखिही अडीच हजार वनराई बंधारे उभारण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.

रायगड जिल्ह्य़ातील पेण, खालापूर, म्हसळा, तळा, महाड पोलादपुर, श्रीवर्धन, अलिबाग आणि पनवेल या तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या जाणवते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच या तालुक्यात वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे स्थानिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्य़ातील ४२ हजार ७० लोकांनी या कामासाठी श्रमदान केले. रोहा तालुक्यात सर्वाधिक ३१९ बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. तर उरण तालुक्यात सर्वात कमी ६४ वनराई बंधारे बांधले गेले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पि. एस. साळुंखे यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. कुठलाही शासकीय निधीचा वापर न  करता. ही योजना अंमलात आणली गेली.

वनराई बंधाऱ्याचे फायदे

या वनराई बंधाऱ्यामुळे रब्बी हंगामातील भाजीपाला, तृणधान्य पिकाला पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर कुटिरोद्योग ( वीटभट्टी, मत्सबीज ) यांनाही मुबलक पाणी मिळणार असून घरगुती वापरासाठी, पशुधन, पक्षी यांना पिण्यासाठी याचा वापर स्थानिक ग्रामस्थ करू शकतात. तर महत्वाचे म्हणजे या वनराई बंधाऱ्याने भूजल पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.

तालुकानिहाय वनराई बंधारयांची आकडेवारी

रोहा (३१९), पनवेल (३१२), माणगाव (२५७), खालापूर (२४३), पोलादपूर (२२६), महाड (२१४), अलिबाग (२१०),  म्हसळा (१७८), सुधागड (१६४),  तळा (१५६),  पेण (१२७),  मुरुड (१२७), कर्जत (११०),  श्रीवर्धन (९७), उरण (६४).