05 July 2020

News Flash

राष्ट्रवादीने छत्रपतींना काय दिले याचा हिशेब देणार का?

मुख्यमंत्र्यांचा महाजनादेश यात्रेत सवाल

(संग्रहित छायाचित्र)

छत्रपतींच्या घराण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला खूप काही दिले, परंतु राष्ट्रवादीने छत्रपतींना काय दिले याचा हिशेब राष्ट्रवादी देणार का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे महाजनादेश यात्रेत केला.

छत्रपतींचे घराणे देणारे घराणे आहे, ते घेणारे घराणे नसून त्यांनी तुमच्या पक्षाला खूप काही दिले आहे. तुम्ही त्यांना काय दिले याचा आधी हिशेब द्या. तुम्ही त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे उत्तर जनताच तुम्हाला देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सातारा येथे आली. यानंतर जाहीर सभा झाली. या वेळी उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कोणतीही अट ठेवून, वैयक्तिक कामे घेऊ न भाजपामध्ये आलेले नाहीत, तर त्यांनी फक्त जनतेची कामे सुचविली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:18 am

Web Title: what the ncp has given to chhatrapati says devendra fadnavis abn 97
Next Stories
1 बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित महाराष्ट्र घडवायचाय!
2 सुजय विखे यांच्या वक्तव्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करू – दीपाली सय्यद
3 विकासकामे मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा – मुख्यमंत्री
Just Now!
X