विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात फिरतो आहे. तरुण पिढीमध्ये परिवर्तनाची भावना आहे असं दिसून आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन पाहण्यास मिळेल असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी विविध प्रश्नांना शरद पवार यांनी उत्तरं दिली. सध्या महाराष्ट्रात काय चित्र दिसतं आहे असं विचारलं असता, तरुण पिढीमध्ये परिवर्तनाची भावना पाहण्यास मिळते आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जणाऱ्यांचं काही वाटत नाही. जे लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असेच लोक सोडून गेले आहेत.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारलं असता, ” उदयनराजे यांनी माझी भेट घेतली. दुपारी १२ वाजता माझ्याशी चर्चा केली. तेव्हा एक बोलले आणि दुपारी ३ वाजता वेगळाच निर्णय समोर आला. ते भाजपात का गेले ते समजू शकलेलं नाही ” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.