औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या प्रक्रियेची सर्व तयारी झालेली असून एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्य़ात एकूण २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार असून त्यात १५ लाख ३ हजार ६० पुरुष व १३ लाख ४६ हजार ६६९ महिला मतदारांचा समावेश आहे. २६ इतर मतदान आहे. महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४७.२५ एवढी आहे. तर ५५.७४ टक्के पुरुष मतदारांचे प्रमाण आहे.

औरंगाबादमधील पश्चिम मतदार संघात सर्वाधिक ३ लाख ३५ हजार ५९ एवढे मतदान आहे. तर सर्वात कमी मतदान पैठण मतदार संघात आहे. पैठणमध्ये एकूण २ लाख ९३ हजार मतदार असून त्यात एक लाख ५५ हजार ९३८ पुरुष तर १ लाख ३७ हजार ६५९ महिला मतदार आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार संघामध्ये एकूण ३ लाख १७ हजार ९५८ मतदार असून त्यात १ लाख ६६ हजार ९७४ पुरुष तर १ लाख ५० हजार ९८३ महिला मतदार आहेत. औरंगाबाद मध्य मतदार संघात ३ लाख २४ हजार ६६२ मतदार असून त्यात १ लाख ६७ हजार २२६ पुरुष तर १ लाख ५७ हजार ४३६ महिलांचे मतदान आहे. सिल्लोड मतदार संघात ३ लाख १६ हजार ९३८ एकूण मतदार असून १ लाख ६८ हजार ३६४ पुरुष तर १ लाख ४८ हजार ५७४ महिलांचे मतदान आहे. कन्नड मतदार संघात ३ लाख १४ हजार २२२ मतदार असून त्यात पुरुष १ लाख ६५ हजार ८९० पुरुष तर १ लाख ४८ हजार ३३२ महिलांचे मतदान आहे. गंगापूरमध्ये ३ लाख १२ हजार ४०६ एकूण मतदार असून त्यात १ लाख ६५ हजार १५८ पुरुष तर १ लाख ४७ हजार २४० महिलांचे मतदान आहे. वैजापूरमध्ये ३ लाख ९ हजार २० मतदार असून त्यात १ लाख ६२ हजार ३०७ पुरुष तर १ लाख ४७ हजार ११३ महिला मतदार आहेत.

फुलंब्री मतदार संघात ३ लाख २५ हजार ४९१ मतदार असून त्यामध्ये पुरुष १ लाख ७२ हजार तर महिला १ लाख ५२ हजार ८६९ मतदार आहेत

औरंगाबादेत ९७८ मतदान केंद्र

औरंगाबाद शहरातील तीन मतदार संघांत मिळून ९७८ मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातील ८० हून अधिक मतदान केंद्रांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. बंदोबस्तासाठी केंद्रीय सशस्त्र पालीस दलाच्या चार कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी व इतर ठिकाणाहून २०० गृहरक्षकदलाचे जवान शहरात दाखल झालेले आहेत. शिवाय १ पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक आणि ३० पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तैनात असतील. १०० वाहने गस्तीसाठी शहरभर फिरणार आहेत.

मतदारसंघनिहाय केंद्र,

औरंगाबाद पश्चिम-३४२, औरंगाबाद पूर्व- ३१२, औरंगाबाद मध्य- ३२४, सिल्लोड-३६१, कन्नड- ३५१, फुलंब्री -३४८, पैठण –  ३२५, गंगापूर – ३१५ व वैजापूर मतदारसंघात ३४६ केंद्र आहेत. तर ३ हजार २४ मतदान केंद्रांसाठी ४ हजार २४० व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.