02 June 2020

News Flash

भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे संविधान चौकात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

मुख्यमंत्र्यांसह पाच उमेदवारांचे अर्ज दाखल

ढोल-ताशांच्या निनादात शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सहा व  काँग्रेसच्या चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे संविधान चौकात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रामनगरातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, सरोज पांडे, राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि शहर व जिल्ह्य़ातील सर्व बारा मतदारसंघातील उमेदवार पोहचले. कांचन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व उमेदवारांचे औक्षवण केले. त्यानंतर सर्वच विधान भवन चौकात पोहोचले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले आणि त्यानंतर खुल्या जीपमधून मिरवणुकीने ते तहसील कार्यालयात पोहचले. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दक्षिण पश्चिमचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम नागपूरचे सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरचे डॉ. मिलिंद माने, मध्य नागपूरचे विकास कुंभारे, दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते व पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे मंगेश कढव, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, बाळू घरडे उपस्थित होते. –बाराही उमेदवार जनता निवडून देईल – गडकरी

मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये न येता राज्याकडे लक्ष द्यावे. शहर व जिल्ह्य़ातील सर्व बाराही उमेदवार जनता निवडून देईल, असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात जेवढे यश मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने यश यावेळी महायुतीला मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

बावनकुळे,कोहळेही सहभागीभाजपने उमेदवारी नाकारलेले राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे हेसुद्धा संविधान चौकात मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शिवसैनिकांची नाराजी उघड

महायुती झाली असली तरी मुख्यमंत्री शहरातील सर्व उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव व अनेक प्रमुख कार्यकर्ते तिकडे फिरकले नाहीत. शिवसेनेला शहर आणि जिल्ह्य़ात एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून भाजपचे उमेदवार अर्ज भरताना ती उघड झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 3:22 am

Web Title: bjp cm devendra fadnavis akp 94 3
Next Stories
1 काँग्रेसकडून एकीचे दर्शन
2 विकास ठाकरे यांच्यावर २५ गुन्हे, साडेतीन कोटींची संपत्ती
3 रक्ताच्या बदल्यात रक्तदानास नातेवाईक अनुत्सुक!
Just Now!
X