परळीतील अखेरच्या सभेत ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना भोवळ आली आणि त्या व्यासपीठावरच कोसळल्या. पंकजा मुंडे व्यासपीठावर कोसळल्यामुळे एकच गोंधळ झाला होता. नेते आणि पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन त्यांना सावरलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे यांनी शनिवारी कन्हेरवाडी, जिंतूर, पाटोदा, वडवणी आणि परळी शहर या पाच ठिकाणी  सभा घेतल्या. परळी शहरातील सभेचे भाषण झाल्यानंतर त्यांना अचानक व्यासपीठावरच चक्कर आली. पंधरा दिवसांपासूनचे दौरे, जागरण, दगदग आणि धावपळ यामुळे त्या काहीशा अस्वस्थ होत्या. चक्कर आल्यानंतर शहरातील परळी टॉवरजवळ रूग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीसाठी परळीत शेवटची प्रचार सभा घेण्यासाठी पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. परळी शहरातील रानी लक्ष्मीबाई टॉवर चौकात ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी ४० ते ४५ मिनिटं भाषण केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshtra vidhansabha elction 2019 pankaja munde nck
First published on: 19-10-2019 at 18:43 IST