संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार असून, ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.
विधानसभेसाठी मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मतदानाचा अधिकार बजावताना मतदान केंद्राची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमचं मतदान केंद्र माहित नसेल तर एका एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. आयोगाच्या https://electoralsearch.in आणि http://103.23.150.139/marathi/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड , राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

मतदान करताना याकडं लक्ष द्या–
विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमसोबत अत्याधुनिक व्हीव्हीपॅट जोडलं असतं. व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदाराने दिलेल्या उमेदवाराला मत नोंदविले गेल्याबद्दल खात्री करून घेता येते. मतदान केल्यानंतर ज्याला मतदान केलं. त्याच चिन्हाची चिठ्ठी सात सेकंद व्हीव्हीपॅटवर दिसते. त्यानंतर ही चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये पडते. त्यामुळे आपलं मत बरोबर पडलं की नाही याचीही खात्री करून घेता येते.