15 August 2020

News Flash

जागा शिवसेनेला गेली; फडणवीसांच्या कॅबिनेटमधील मंत्र्याला अश्रू अनावर

कार्यकर्त्यांना समजावताना पालक मंत्र्यांनाच रडू आले

मंत्र्याला आश्रू अनावर

शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या जागावाटपानंतर मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाटल्याला गेल्याने दोन्ही पक्षातील स्थानिक नेते दुखावल्याचे चित्र दिसत आहे. असंच काहीसं घडलं आहे लातूर ग्रामीणच्या जागेसंदर्भात. ही जागा सेनेला जाहीर झाल्याने पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घराबाहेर ही जागा भाजपानेच लढवली पाहिजे अशी मागणी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले दिला. या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी घराबाहेर आलेले राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना अश्रू अनावर झाले.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या जागा वाटपामध्ये लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला मिळाली. या निर्णयामुळे मुंडे समर्थक आणि भाजपाचे रमेश कराड समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. पंजका मुंडेचे निकटवर्तीय असणाऱ्या कराड यांनी दोनदा पराभव झाल्यानंतरही या भागामध्ये आपला राजकीय दबदबा कायम ठेवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षांमधील तरुण कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश केला आहे. असे असतानाही जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सोडल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणे चुकीचे असल्याचे मत मांडत हा निर्णय मागे घेऊन लातूर ग्रामीणमधून भाजपा उमेदवार उभा करावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. निलंगेकरांच्या घराबाहेर घोषणाबाजी करत लातूर ग्रामीण भाजपालाच हवा असं सांगत या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी निलंगेकर यांनी स्वत: कार्यकर्त्यांची समजूत घातली. मात्र यावेळी त्यांनाच रडू आल्याचे पहायला मिळाले. आपण यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना मांडू असं निलंगेकर यांनी सांगितलं.

निलंगेकर यांनी येऊन समजूत घातल्यानंतरही कार्यकर्त्यांनी लातूर ग्रामीण भाजपाला मिळाली नाही तर जिल्ह्यामध्ये एकही भाजपा उमेदवार निवडून देणार नाही असं इशाराच दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 9:59 am

Web Title: sambhaji patil nilangekar got emotional while talking about bjp not getting latur rural seat scsg 91
Next Stories
1 मनसेतून शिवसेनेत गेलेल्या आमदार शरद सोनवणेसह संग्राम थोपटे, दिलीप मोहिते कोटय़धीश!
2 शाह आता गृहमंत्री आहेत, पण घुसखोरांना नक्की केव्हा बाहेर काढणार? : शिवसेना
3 VIDEO: राजकारण ते समाजकारण, नितीन नांदगावकर यांची रोख’ठोक’ मुलाखत
Just Now!
X