मतदान करा एका मिसळीवर एक फ्री, तीन पॅटीसवर एक फ्री अशी ऑफर पुण्यात देण्यात आली आहे. पुण्यात एका मिसळीवर एक मिसळ, तीन पॅटीसवर एक पॅटिस फ्री आणि कपड्यांवर १० टक्के सवलत देण्यात आली आहे. विधानसभेसाठी निवडणूक सुरु असून मतदारांमध्ये उत्साह पाहण्यास मिळतो आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. पुण्यात मतदान केल्याची खूण म्हणून शाई लावण्यात आलेले बोट दाखवा आणि सवलत मिळवा असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.कोथरुड येथील कडक भडक मिसळ सेंटरमध्ये एकामिसळीवर एक मिसळ फ्री अशी ऑफर देण्यात आली आहे. तर डीपी रोडवर असलेल्या पुणे मिसळमध्ये एका मिसळीवर २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. पूना बेकरीत तीन पॅटिसवर एक पॅटिस फ्री तर कॉटन किंगमध्ये कपड्यांवर दहा टक्के सवलत देण्यात आली आहे.
पूना बेकरीत तीन पॅटिसवर एक पॅटिस फ्री तर कॉटन किंगमध्ये कपड्यांवर दहा टक्के सवलत देण्यात आली आहे.