कोकण रेल्वे मार्गावर कणकवली रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर बोर्डवे येथे जेसीबी मशीनमुळे चार डबे फाटले जाऊन १५ प्रवासी जखमी झाले. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानतेमुळे रेल्वे थांबल्याने अनर्थ टळला.
करमळी-मुंबई अशी धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान कणकवली स्थानकावरून निघाली. कणकवली स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर बोर्डवे आहे तेथे उंचावर जेसीबी क्वारीवर काम करत होती. ती ट्रकवर येऊन कोसळत असतानाच साइडने रेल्वे जात होती.
रेल्वे मोटरमन याच्या लक्षात आले. जेसीबी खाली कोसळत असल्याचे पाहून गाडी त्याने रोखण्याचा प्रयत्न केला. पण जेसीबीने रेल्वेचा गार्डचा डबा, एसी डबा व दोन सीटिंग डबे मिळून चार डबे ओढले गेले. या डब्यांचा पत्रा फाटला गेला.
मुंबईला जाणारे प्रवासी या रेल्वेत होते. या रेल्वेचे चार डबे फाटले गेल्याने पंधरा प्रवासी जखमी झाले. हा जेसीबी ट्रकच्या बाजूला पडल्याने दुर्दैवी अनर्थ टळला. अन्यथा रेल्वेला भीषण अपघात घडला असता असे प्रत्यक्षदर्शिनी बोलताना होतील.
जनशताब्दीच्या या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतुकीस बराच वेळ अडथळा आला. हा अडथळा दूर होताच रेल्वेमार्ग पूर्ववत सुरू झाला. या जेसीबीच्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली असून जखमी पंधराही जणांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.