आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना महायुती अबाधित राहण्यासाठी भाजप-शिवसेनेने थोडा त्याग करण्याची गरज आहे. महायुतीकडून किमान १५ जागा तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडाव्यात, अशी मागणी या पक्षाचे नेते, खासदार रामदास आठवले यांनी केली. १५ पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
सोलापुरात एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर खासदार आठवले यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका विशद केली. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट व नकारात्मक कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. अर्थात, यात रिपाइंची मते निर्णायक ठरतील, असा दावाही त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2014 रोजी प्रकाशित
विधानसभेसाठी १५ पेक्षा कमी जागा घेणार नाही-खा. आठवले
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना महायुती अबाधित राहण्यासाठी भाजप-शिवसेनेने थोडा त्याग करण्याची गरज आहे. महायुतीकडून किमान १५ जागा तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडाव्यात, अशी मागणी या पक्षाचे नेते, खासदार रामदास आठवले यांनी केली.
First published on: 29-08-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 seats for rpi ramdas athawale