राज्यातील ९१ सहकारी व ७३ खाजगी अशा एकूण १६४ साखर कारखान्यांनी १७ डिसेंबपर्यंत सुमारे २ कोटी ३० लाख पोती साखरेची (२३ लाख १० हजार टन) निर्मिती केली आहे. राज्यात आत्तापर्यंत २ कोटी २९ लाख ५ हजार टन उसाचे गाळप झाले असून, राज्याचा साखर उतारा १०.९ टक्के आहे. दुष्काळ व अन्य नैसर्गिक कारणांमुळे यंदा साखर उत्पादन घटेल, असा अंदाज व्यक्त होतो.
राज्यातील साखर कामगारांनी वेतनवाढ करारासाठी येत्या २८ डिसेंबरला पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचा तसेच २ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांपुढे दैनंदिन गाळपाची समस्या निर्माण होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2015 रोजी प्रकाशित
राज्यात २ कोटी ३० लाख पोती साखरेची निर्मिती
साखर कारखान्यांपुढे दैनंदिन गाळपाची समस्या निर्माण होणार आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 19-12-2015 at 00:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 crore 30 lakh bags of sugar produced in the state