मुंबई येथील महिला महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार धुळे शहरात उघडकीस आला. याप्रकरणी एकाच कुंटूबातील ५ जणांविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील सागर अनिल सुर्यवंशी आणि अनिल वामन सुर्यवंशी यांनी रिंकु संजय पाटील (वय २१, रा.धुळे) या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयात नोकरी देतो असे सांगून तिच्याकडून ३ लाख रुपये घेतले. यानंतर बनावट नियुक्तीपत्र देवून त्यांनी रिंकूची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यावर रिंकू आणि तिचे कुंटुबीय सुर्यंवशी यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी गेले. यावेळी सुर्यवंशी कुटुंबीयांनी त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी सागर अनिल सुर्यवंशी, अनिल वामन सुर्यवंशी, सरला अनिल सुर्यवंशी, अनुराधा अनिल सुर्यवंशी आणि श्‍वेता अनिल सुर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 year old woman alleges fraud for job in dhule
First published on: 15-09-2017 at 18:51 IST