Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली आणि संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. इर्शाळवाडीत दोन दिवस बचावकार्य करण्यात आलं आता उद्याही बचावकार्य सुरु असणार आहे अशीही माहिती मिळते आहे. गुरुवारी दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असून अजूनही तिथे ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. समोर आलेल्या यादीनुसार आत्तापर्यंत या घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जखमींची यादी समोर आली आहे.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची नावं

१) रमेश भवर, वय-२५ वर्षे

२) जयश्री रमेश भवर, वय-२२ वर्षे

३) रुद्रा रमेश भवर, वय १ वर्ष

४) विनोद भगवान भवर, वय ४ वर्ष

५) जिजा भगवान भवर, वय २३ वर्षे

६) अंबी बाळू पारधी, वय ४५ वर्षे

७) बाळू नामा पारधी, वय ५२ वर्षे

८) सुमित भास्कर पारधी, वय ३ वर्षे

९) सुदाम तुकाराम पारधी, वय १८ वर्षे

१०) दामा सांगू भवर, वय ४० वर्षे

११) चंद्रकांत किसन वाघ, वय १७ वर्षे

१२) राधी दामा पवार, वय ३७ वर्षे

१३) बाळी नामा भुतांब्रा, वय ७० वर्षे

१४) भास्कर बाळू पारधी, वय ३८ वर्षे

१५) पिंकी उर्फ जयश्री भास्कर पारधी

१६) अन्वी भास्कर पारधी, वय १ वर्षे

१७) कमळ मधू भुतांब्रा, वय ४३

१८) कान्ही रवी वाघ, वय ४५ वर्षे

१९) हासी पांडुरंग पारधी, वय ५० वर्षे

२०) पांडूरंग धाऊ पारधी, वय ६० वर्षे

२१) मधू नामा भुतांब्रा, वय ४५ वर्षे

२२) रविंद्र पदू वाघ, वय ४६ वर्षे

हे पण वाचा- मनुष्यबळासह मारिया, फिरो आणि जॉकीसुद्धा मदतीला; बचावकार्यात अडचणी येत असल्याने श्वानपथक तैनात

आत्तापर्यंत या दुर्घटनेत या २२ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या २२ जणांमध्ये ११ स्त्रिया आहेत तर ११ पुरुष आहेत अशीही माहिती समजते आहे.

इर्शाळवाडी प्रकरणातील जखमींची नावं काय?

प्रवीण पांडुरंग पारधी
यशवंत राघो डोरे
भगवान हरी भवर
मनिषा यशवंत डोरे
रामी रामा पारधी
लक्ष्मण दत्तात्रेय भगत
कमळी महादू पारधी
हरी चांगू भवर
तुकाराम नामो पारधी
अनंत रामा पारधी
जना हाशा पारधी
मंगेश जना पारधी
काळी जना पारधी
विष्णू नामा पारधी
मती हरी भवर
जयश्री अशोक दरवडा
वनिता विष्णू पारधी
अशोक धर्मा दरवाडा
राजेंद्र जैतू पारधी
मारुती राम सुतक
सीमा जगदीश पारधी

हे पण वाचा- इर्शाळवाडी गावाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत गिरीश ओक म्हणाले, “आताच्या त्रासापेक्षा नंतरची हळहळ जीवघेणी”

अशी २१ जखमींची नावं आहे. या २१ जणांपैकी ११ जणांना प्रथमोपचार करुन सोडण्यात आलं आहे. सहा जखमींवर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका जखमी रुग्णावर पनवेलच्या उपजिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तर तीन रुग्णांवर MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुठे आहे इर्शाळवाडी?

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर इर्शाळवाडी आहे. साधारणपणे ४८ कुटुंबांची ही वाडी असून त्यातील २५ ते ३० घरांवर दरड कोसळल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी विधानसभेतील निवेदनात दिली. पायथ्यापासून काही उंचीवर ही वाडी वसली आहे. मात्र, या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि प्रशासनाला जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत नेणं अशक्य झालं आहे. दोन तासांची पायपीट करूनच पायथ्यापासून घटनास्थळापर्यंत पोहोचणं शक्य होत आहे.