Petrol & Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल आज नवीन अपडेट समोर आली आहे ; ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागपूर, नंदुरबार, सांगली या शहरांत पेट्रोल स्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. तर पुणेकरांनाही दिलासा मिळाला आहे. पुण्यात डिझेल स्वस्त झाल्याचे चित्र दिसते आहे. २२ मे २०२४ रोजी पुण्यात डिझेलची किंमत ९६.४६ अशी होती. तर आजच्या तारखेला डिझेलची किंमत ९०.२३ रुपये आहे. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.४४९०.९६अकोला१०४.०५९०.६२अमरावती१०५.१५९१.६७औरंगाबाद१०४.६६९१.१७भंडारा१०४.६१९१.१५बीड१०५.३८९१.८७बुलढाणा१०६.०२९२.४८चंद्रपूर१०४.३१९०.८७धुळे१०३.९२९०.४७गडचिरोली१०४.७४९१.२९गोंदिया१०५.७६९२.२५हिंगोली१०५.८५९२.३४जळगाव१०४.०९९०.६३जालना१०६.२७९२.७२कोल्हापूर१०४.३९९०.९४लातूर१०५.११९१.६२मुंबई शहर१०४.२१९२.१५नागपूर१०३.९६९०.५२नांदेड१०६.२३९२.७१नंदुरबार१०४.९१९१.४२नाशिक१०३.८१९०.३५उस्मानाबाद१०५.२८९१.७९पालघर१०३.९७९०.४८परभणी१०६.७१९३.१४पुणे१०३.६९९०.२३रायगड१०३.७१९०.२३रत्नागिरी१०५.५२९१.८९सांगली१०४.३३९०.८८सातारा१०५.३४९१.८१सिंधुदुर्ग१०५.७७९०.२७सोलापूर१०४.९५९१.४७ठाणे१०३.८९९०.४०वर्धा१०४.९२९१.४५वाशिम१०४.९९९१.५२यवतमाळ१०५.२१९१.७३ तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे काही राज्यातील नागरिकांसाठी अगदीच दिलासादायक बातमी आहे. तर काही राज्यातील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण - काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ तर काही ठिकाणी दर स्थिर पाहायला मिळाले आहेत. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होत असतात. सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास दररोज अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. पण, महाराष्ट्रातील मुंबई शहरात १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. आजचे नवीन दर पाहता घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत काय दर आहे तपासून घ्या व पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.