महाराष्ट्रात ३२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३६४८ इतकी झाली आहे. ३२८ पैकी सर्वाधिक म्हणजे १८४ रुग्ण फक्त मुंबईत आढळले आहेत. तर पुण्यात ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज मुंबईत सर्वाधिक १८४ रुग्ण आढळल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची वाढती संख्या ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मात्र महाराष्ट्रात करोनाच्या चाचण्याही सर्वाधिक झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे अशी माहिती याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान देशभरात करोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्या रुग्णांमध्ये साडेतीन हजाराच्या पुढे रुग्णसंख्या असणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच सगळे व्यवहार करा असं आवाहन करण्यात येतं आहे.

मुंबईत १८४ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच या सगळ्या संख्या समोर आल्या आहेत. मुंबईसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईतही सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. तसंच लॉकडाउनचे नियमही कठोर करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.