लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ३५२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ३८३ जण करोना मुक्त झाले. सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ३ हजार ५०१ करोनाचे रुग्ण आहेत. तर ५ हजार ८५५ रुग्ण करोना मुक्त झाले आहे. तर २५६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या ९ हजार ६१२ वर पोहोचली आहे. ७८८ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात ३५२ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १४५, पनवेल ग्रामिण मधील ३४, उरण मधील ३१, खालापूर २३, कर्जत ४, पेण ३९, अलिबाग ५७, मुरुड १४, रोहा २, श्रीवर्धन १, महाड १ पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत १, उरण २, खालापूर २, अलिबाग १, पोलादपूर १, अशा तब्बल ७ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३८३ जण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३२ हजार ३५२ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५०१ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४३२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४८४, उरण मधील १७३, खालापूर २८४, कर्जत ११७, पेण ३८४, अलिबाग ३११,  मुरुड ५६, माणगाव ५५, तळा येथील २, रोहा ७०, सुधागड १, श्रीवर्धन ३५, म्हसळा ४८, महाड ४१, पोलादपूर मधील ८ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६१ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 352 new corona patients in raigad district and seven dead in last 24 hours scj
First published on: 17-07-2020 at 20:29 IST