लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे, पत्नी व मुलगी अशा एकत्रित कुटुंबाकडे ३८ कोटींची मालमत्ता असल्याचे विवरण देण्यात आले आहे. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी उमेदवार सुरेश धस यांच्यापेक्षा मुंडेंकडे चारपट अधिक मालमत्ता आहे. मुंडे कुटुंबीयांकडे वेगवेगळ्या संस्थांचे २२ कोटी २७ लाख कर्ज असल्याचेही नोंदवण्यात आले आहे.
शपथपत्रात मुंडेंकडे ६ लाख, पत्नी प्रज्ञा मुंडे यांच्याकडे ८ लाख, मुलगी यशश्री यांच्याकडे ५ लाखांची रोकड, तर िहदू एकत्रित कुटुंबाची ८ लाखांची रोकड आहे. वेगवेगळ्या ठेवी, शेअर्स, पॉलिसी, येणे कर्ज अशी मिळून मुंडेंच्या नावावर २ कोटी ५६ लाखांची चल संपत्ती आहे. प्रज्ञा मुंडेंकडे ४ कोटी ४९ लाख, तर चल संपत्तीमध्ये यशश्री मुंडे यांच्याकडे २ कोटी ३९ लाखांची मालमत्ता असून िहदू एकत्रित कुटुंबाची मालमत्ता ४ कोटी १६ लाखांची आहे.
जमीनजुमला, जनावरे आदींच्या माध्यमातूनही मुंडे कुटुंबाची मालमत्ता मोठय़ा प्रमाणात आहे. मुंडे यांच्या नावे ७ कोटी ८९ लाख ६६ हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रज्ञा मुंडे यांच्या नावावर १४ कोटी २५ लाख, तर यशश्री यांच्या नावावर सव्वादोन कोटींची स्थावर मालमत्ता आहे. मुंडे कुटुंबाच्या नावावर वेगवेगळया व्यक्ती व संस्थांचे २२ कोटी २७ लाखांचे कर्जही आहे. मुंडे कुटुंबीयांकडे ५ वर्षांपूर्वीची चल संपत्ती ६ कोटींच्या घरात होती, तर स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे १५ कोटींच्या आसपास होती. या संपत्तीत ५ वर्षांत लक्षणीय वाढ झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे साडेआठ कोटींची संपत्ती असून धस यांच्यापेक्षा मुंडे यांची संपत्ती चारपटीने अधिक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
खा. मुंडे यांच्याकडे ३८ कोटींची मालमत्ता
लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे, पत्नी व मुलगी अशा एकत्रित कुटुंबाकडे ३८ कोटींची मालमत्ता असल्याचे विवरण देण्यात आले आहे. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी उमेदवार सुरेश धस यांच्यापेक्षा मुंडेंकडे चारपट अधिक मालमत्ता आहे.
First published on: 27-03-2014 at 01:35 IST
TOPICSगोपीनाथ मुंडेGopinath Mundeनिवडणूक २०२४Electionप्रॉपर्टीPropertyबीडBeedसुरेश धसSuresh Dhas
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 38 cr property of gopinath munde