अक्कलकोटमधील शासकीय वसतिगृहातील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यासाठी पोहे देण्यात आले होत. ते खाल्ल्यावर मुलांना उलट्या, मळमळणे आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यापैकी १७ विद्यार्थ्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, इतरांवर अक्कलकोटमध्येच उपचार सुरू आहेत. पोह्यातून विषबाधा होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(संग्रहित छायाचित्र)
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2015 रोजी प्रकाशित
अक्कलकोटमध्ये ४० विद्यार्थ्यांना विषबाधा
अक्कलकोटमधील शासकीय वसतिगृहातील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
First published on: 06-02-2015 at 12:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 students from solapur district are suffering from poisoning