सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला पोलीस अधिकाऱयांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयोसह महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.
मारहाण केलेल्या पोलीस अधिकाऱयांवर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने डॉक्टरांनी बेमुदत संपावर जाण्याचे ठरविले. सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एका निवासी डॉक्टरला तेथील पोलीस उपनिरीक्षकांनी बेदम मारहाण केली. या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करावे, त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, सर्व शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करावी अशा मागण्या महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेनी केल्या आहेत.
“आमच्या जवळ घटनेचे सीसीटीव्ही पुरावे आहेत. यात पोलीस स्पष्टपणे डॉक्टराला मारहाण करताना दिसत आहे आणि यावर केवळ तक्रार दाखल केली असून पुढील कोणतही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.” असे महाराष्ट्र निवासी डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉ.हर्षल पंशेव्दिकार यांनी सांगितले.
तीन पोलीस अधिकाऱयांनी सोलापूर शासकीय रूग्णालयात निवासी डॉक्टरावर पोलीसी खाक्या दाखवून उपचार करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. संबंधित डॉक्टर आधीच दुसऱया रुग्णाच्या उपचारात व्यस्त होता. तरीही जबरदस्ती करून त्या डॉक्टराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
पोलिसांकडून डॉक्टराला मारहाण प्रकरण: महाराष्ट्रातील चार हजार निवासी डॉक्टर संपावर!
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला पोलीस अधिकाऱयांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयोसह महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.
First published on: 02-01-2014 at 02:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4000 resident docs in mah strike work over colleagues assault