राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४१ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही बालके मंगळवारी शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन स्वतंत्र बसमधून त्यांच्या पालकासह एस. आर. सी. सी. रूग्णालय मुंबईकडे रवाना झाल्या.

हेही वाचा- ‘…तर मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल” ; धनंजय मुंडेचं विधान!

जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय सांगली येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व बालकांचे पालक, नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा- VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात २०१३-१४ पासून १ हजार २७४ बालकांवर हृदयरोग शस्त्रक्रिया तर १० हजार ८९३ लाभार्थी बालकांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा सातत्याने राज्यस्तरावर अग्रस्थानी आहे.
हृदय शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेल्या जिल्ह्यातील ४१ बालकांमध्ये मिरज तालुक्यातील २, कवठेमहांकाळ २, जत ११, आटपाडी ३, कडेगाव १, खानापूर ३, पलूस ६, तासगाव ३, वाळवा ४, शिराळा ३ आणि महानगरपालिका क्षेत्रातील ३बालकांचा समावेश आहे.

हेही वाचा- “…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”; शिवरायांचा संदर्भ देत संभाजीराजे छत्रपतींचा ‘जशास तसे उत्तर’ देण्याचा इशारा

या बालकांवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून यासाठी सुमारे दोन कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च क्विन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व रोटरी क्लब ऑफ मुंबई, इतर धर्मादाय संस्था आणि दानशुरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.