गुरूवारी रात्री 28 तर शुक्रवारी 30 अशा 58 रुग्णांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. यामूळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 235 झाली. तसेच आज नवीन 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील विलगीकरणातील 9 एसआरपीएफ जवान कोरोनाबाधित आढळले. तर भामरागड येथील 3 बाधितांमध्ये ग्रामीण रुग्णालयातील एक डॉक्टर, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला पंचायत समितीचा अभियंता व ग्वाल्हेर येथून आलेल्या एका मजूराचा समावेश आहे. अभियंता व मजूर संस्थात्मक विलगीकरणात होते. याव्यतिरिक्त आरमोरी येथील एकजण तामिळनाडू येथून परतला होता तोही बाधित आढळून आला आहे. अशा रीतीने आज 58 कोरोनामुक्त व 13 नवीन बाधित आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एसआरपीएफचे 43 जवान, सीआरपीएफचे 11 व 4 स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 205 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 441 झाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या संख्येमध्ये गडचिरोली जिल्हा रुग्णालयासह धानोरा, एटापल्ली येथील कोरोना रुग्णलायाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दवाखान्यातून सोडताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, डॉ.दुर्वे, शंकर तोगरे तर तालुकास्तरावर डॉ. मुकुंद ढाबले, डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ. किनलाके उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांना पुढील 7 दिवस विलगीकरणाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 58 coronavirus patients recovered gadchiroli maharashtra jud
First published on: 24-07-2020 at 21:02 IST