पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेली रोख रक्कम बुधवारी रात्री लातूर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केली. यात ६५ लाख ३२ हजार ५०० रुपये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या २ एप्रिलला पुण्यातील िहजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ आरोपींनी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या एकास वाहन आडवे लावून धाक दाखवून रोख रक्कम लुटल्याची तक्रार दाखल झाली होती. पुणे पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्यास कळविले होते. लातूर पोलिसांना संबंधित आरोपी लातुरात असल्याची माहिती मिळाली. बुधवारी रात्री साडेदहा वाजता अधीक्षक बी. जी. गायकर व अतिरिक्त अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वैभवनगर येथे सुरज राऊत याच्या घराची झडती घेतली. याच वेळी िहजवडीचे पोलीसही आले. राऊत याने साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले. घराच्या झडतीत कपाटात ६५ लाख ३२ हजार ५०० रुपये रोकड जप्त करण्यात आले व संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
पुण्यामधून लांबविलेले ६५ लाख लातुरात जप्त
पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेली रोख रक्कम बुधवारी रात्री लातूर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केली. यात ६५ लाख ३२ हजार ५०० रुपये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
First published on: 11-04-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65 lakhs seized in latur