बीड : आठवर्षीय बालिकेला जवळच्याच एका पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर तीन अल्पवयीन बालकांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणात तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियमासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी सायंकाळी उशिरा आठ वर्षांची बालिका घरातील भंगार सामान विक्रीसाठी घेऊन जात असताना त्या ठिकाणी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी तिला बळजबरीने एका खोलीत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. तेथील एका व्यक्तीने मुलांना हटकले असता हा प्रकार उघडकीस आला. मुलांच्या तावडीतून बालिकेची सुटका करत तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा >>> डॉक्टरच्या सतर्कतेमुळे बालविवाह उजेडात; भटजीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध सामूहिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाची पत्रव्यवहार केला आहे.