तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. थेरगाव येथे एकाच नावाचे दोघे मतदानासाठी आल्याने काही वेळ मतदान प्रकिया निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवली होती. नंतर पुन्हा सुरळीत झाली. सुपे येथे दोन गटांमध्ये किरकोळ वादावादी झाली.
सर्वच ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मतदार आणण्यासाठी वाहनांचा सर्वत्र वापर झाला. याशिवाय बाहेरगावी असलेले मतदारही आणण्यात आले होते. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विक्रमी मतदान झाले. तालुक्यात ५६ ग्रामंपचायती होत्या. ४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने ५२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. एकूण ९० हजार २५४ मतदारांपैकी ७६ हजार ६३५ मतदारांनी (८४.९१) मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी शुक्रवारी कर्जत तहसील कार्यालयात होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2015 रोजी प्रकाशित
कर्जतला शांततेत ८५ टक्के मतदान
तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.
First published on: 05-08-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 85 percent peaceful voting in karjat