अलिबाग-रायगड जिल्ह्यात करोना बाधित बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यावर पोहोचले आहे. पण मंगळवारी दिवसभरात तब्बल २५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात ४०७ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ५३१ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ४७ हजार २०९ वर पोहोचली आहे. यापैकी ४१ हजार ९०७ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ०११ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १२९१ जणांचा आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात ४०७ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत २३४, पनवेल ग्रामिण ५९, उरण १२, खालापूर १०, कर्जत १०, पेण १४, अलिबाग ३१, मुरुड २, माणगाव ६, तळा ०, रोहा १८, सुधागड २, श्रीवर्धन २, म्हसळा २, महाड ५, पोलादपूर येथील ० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या ४ हजार ०११ करोनाचे रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ८०५,  पनवेल ग्रामिण ६७८, उरण १४६, खालापूर १६९, कर्जत १२२, पेण १९५, अलिबाग ३८०, मुरुड १६, माणगाव १४२, तळा १२, रोहा १७७, सुधागड ३६, श्रीवर्धन २७, म्हसळा १५, महाड ४४, पोलादपूर येथील ४७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे, तर मृत्यूदर ३ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२.३ आहे. २ हजार ५३८ जणांवर गृहविलगिकरणात उपचार सुरु आहेत. २७६ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत असून तर ६३ जण कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 88 percent corona recovry rate in raigad district scj
First published on: 01-10-2020 at 23:58 IST