तब्बल ९२ लाखांचा हिरा साईचरणी अर्पण

साईबाबा संस्थानकडे गेल्या वर्षभरात ९ कोटी १६ लाख रुपयांचे मौल्यवान जडजवाहिर देणगी रुपाने जमा झाले आहेत.

साईबाबा संस्थानकडे गेल्या वर्षभरात ९ कोटी १६ लाख रुपयांचे मौल्यवान जडजवाहिर देणगी रुपाने जमा झाले आहेत. संपलेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ९२ लाख रूपयांचा मौल्यवान पांढरा शुभ्र हिरा साईचरणी अर्पण करण्यात आला आहे. सोन्याच्या साखळीत तो गुंफलेला आहे.
संस्थानचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी सांगितले की, मार्चअखेर संस्थानच्या दानपेटीत गुप्तदान म्हणून तब्बल ८ कोटी १० लाख रूपये किंमतीचे मौल्यवान जडजवाहिरे जमा झालेले आहे. दि. १ एप्रिल ते २१ मार्च १६ या आíथक वर्षांत २२३ मौल्यवान खडे देणगी म्हणून जमा झाले होते. या मौल्यवान हिऱ्यांची एकूण किंमत १ कोटी ६ लाख रुपये आहे. यातील एकाच हिऱ्याची किंमत तब्बल ९२ लाख रूपये आहे. एका सोन्याच्या साखळीत दोन हिरे गुंफले आहेत त्यातील हा एक हिरा आहे. दुसऱ्या हिऱ्यांची किंमत ६ लाख रूपये आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 92 lakh rupees diamond in shirdi sai baba