a medical students murder by her family members in nanded honour-killing | Loksatta

नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा खून करून राख विसर्जित

तरुणीचे गावातील मुलाशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हते

Honor Killing In Nanded
हत्या करण्यात आलेली शुभांगी जोगदंड

Honor Killing In Nanded : नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच वैद्यकीयचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड (वय २३ वर्षे) असं मृत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खून करून प्रेत जाळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- “शरद पवार भाजपाबरोबर आहेत म्हणणं…”, संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले…

वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस मध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूणासोबत तीचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक जुळवली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना काही कारणामुळे आठ दिवसापूर्वी सोयरिक मोडली. त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबीयांना राग अनावर झाला. मुलीमुळे गावात बदनामी झाली या कारणाने गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. राखदेखील बाजूच्या ओढ्यात टाकून दिली.

हेही वाचा- धक्कादायक! भिवंडीत तीन वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून निर्घृण हत्या; तीन दिवसांतील दुसरी घटना

तीन दिवसापासून मुलगी गावात दिसत नसल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा ऑनर किलिंगचा हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडील , मामा, भाऊ आणि काकाची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:52 IST
Next Story
जळगाव : भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, ३.३ रिश्टर स्केल तीव्रता