लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली: तासगाव तालुक्यातील येळावी येथे तरुण दांपत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्यास एक महिन्याचा अवधी कमी असताना दोघांनी एकत्रितपणे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
राज संजय जाधव (वय २३) आणि ॠतुजा जाधव (२०) या दोघांनी घरात बुधवारी रात्री विष प्यायले. सकाळी राज उलट्या करत होता, तर त्याची पत्नी बेशुध्द पडली होती. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा… माजी मंत्री अनिल देशमुख यांना आताच विदर्भ का आठवला ?
राजचे शिक्षण बी.एससी. ॲग्री झाले होते. नोकरी नसल्याने तो घरच्या शेती व्यवसायातच कार्यरत होता. आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप समजले नसून तासगाव पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.