नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाने (आप) मराठवाडय़ात सर्वत्र उमेदवार दिले आहेत. मात्र, मनसेला काही ते जमले नाही. राज्यस्तरीय आंदोलनांच्या िहसक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, अशी आशा आहे. औरंगाबाद, जालना मतदारसंघातून काही बंडखोरही मनसेची उमेदवारी मिळावी, या प्रयत्नात होते. उमेदवारांची चाचपणीही करण्यात आली, पण निर्णयच होत नसल्याने मनसे या निवडणुकीत कागदावरच असेल, असे चित्र आहे.
पहिल्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या नांदेड, परभणी, िहगोली, उस्मानाबाद, बीड व लातूर या ६ मतदारसंघांत मनसेचे उमेदवार नाहीत. त्यामुळे मनसेचे वर्णन ‘बडा घर पोकळ वासा’, असे केले जात आहे. औरंगाबादमधून काहीजणांची चाचपणी करण्यात आली. इच्छूक उमेदवार शुक्रवारी मुंबईतच होते. या सगळ्या प्रकारामुळे मनसेचे कार्यकत्रे बुचकळ्यात पडले आहेत.
आमदार बंब संभ्रमात
लोकसभा निवडणुकीत पक्ष बुचकळ्यात पडले आहेत, तसेच काही आमदारांचेही आहे. आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर मतदारसंघात शुक्रवारी बठका घेतल्या. ते म्हणाले की, खासदार चंद्रकांत खैरे यांचे काम चांगले नाही. म्हणावा तसा त्यांना विकासाला वेग देता आला नाही. काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील हे काही आमच्या दृष्टीने योग्य उमेदवार नाहीत. त्यामुळे कोणाला पािठबा द्यायचा, हे ठरले नाही. आघाडीसोबतचे आमदार अशी ओळख असणाऱ्या बंब यांनी बठका घेण्याचे सत्र सुरूकरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.