आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिवी दिल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्यांनीही या विधानावर आक्षेप नोंदवला आहे.

पाहा >> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. सत्तार यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीचे नेतेही यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार आणि संसदेमधील सुप्रिया सुळेंचे सहकारी असलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचं उल्लेख करत सत्तार यांना सुनावलं आहे.

नक्की वाचा >> सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “…तर CM शिंदेंना मंत्रालयात…”; ३ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NCP आक्रमक

सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात वापरलेल्या अपशब्दांच्या मुद्द्यावरुन कोल्हेंनी दोन ट्वीट केले आहेत. “कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या माँ जिजाऊ एक महिलाच होत्या, ज्योतिबांना स्त्री शिक्षणासाठी साथ देणाऱ्या सावित्रीमाई एक महिलाच होत्या, लोककल्याणकारी राजकारणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या अहिल्यादेवी एक महिलाच होत्या,” अशी आठवण अमोल कोल्हेंनी सत्तार यांना करुन दिली आहे. अमोल कोल्हेंनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याचसंदर्भातून त्यांनी हा दाखला दिसल्याचं दिसून येत आहे.

नक्की वाचा >> Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तारांवर रोहित पवार संतापले

अन्य एका ट्वीटमध्ये, “इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा अनेक महिलांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, त्यामुळे मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधानं करणं निषेधार्ह आहे. या हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा मी तीव्र निषेध करतो,” असं म्हणत अमोल कोल्हेंनी सुप्रिया सुळे यांना टॅग करत अब्दुल सत्तार यांच्या नावाचा हॅशटॅग वापरला आहे.

आणखी वाचा >> अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबुब शेख यांनी प्रसारमाध्यमांसाठी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी या प्रकरणासंदर्भात एक व्हिडीओ जारी करत राज्यभरामध्ये सत्तार यांचे पुतळे जाण्याचं आवाहन केलं आहे.