कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तूल पुरविणारा संशयित अभिनंदन रतन झेंडे (रा. बुधवार पेठ, कराड) हा तरूण गजाआड झाला. सल्याचेप्यावर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी संशयितांनी वापरलेल्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अभिनंदन झेंडे या पोलीस रेकॉर्डवरील संशयिताने सल्याचेप्यावर गोळीबार करण्यासाठी संबंधितांना पिस्तूल पुरविले होते असे तपासात पुढे आले आहे. झेंडे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचेही सल्याशी पूर्ववैमनस्य होते यापूर्वीच्या सल्यावरील हल्ल्यातही त्याला अटक झाली होती असे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. सल्यावर गोळीबार केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून पलायन करण्यासाठी चौघा संशयितांनी दोन दुचाक्या वापरल्या होत्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.