ठाणे जिल्ह्यातील भाईंदर उथन येथे पोलीस दलामध्ये सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू झालेल्या गमेवाडी (चाफळ, ता. पाटण ) येथील जवान मनोहर मधुकर साळुंखे (वय २८) यांच्यावर रविवारी पहाटे जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर साळुंखे चार वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाले होते. सध्या ते उथन ग्रामीण पोलीस स्टेशनला सेवा बजावत होते. मनोहर यांचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2014 रोजी प्रकाशित
जवान मनोहर साळुंखे यांचे अपघाती निधन
ठाणे जिल्ह्यातील भाईंदर उथन येथे पोलीस दलामध्ये सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू झालेल्या गमेवाडी (चाफळ, ता. पाटण ) येथील जवान मनोहर मधुकर साळुंखे (वय २८) यांच्यावर रविवारी पहाटे जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

First published on: 18-03-2014 at 03:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidental death of a young manohar salunkhe