सांगली: वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्यावरून परिवहन विभागाच्या झाडाझडतीमध्ये ३५ खासगी बसवर कारवाई करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या ७५ पैकी पन्नास टक्के बसचालक व मालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे तपासणीत आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातानंतर खबरदारी म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगलीच्या वायुवेग पथकांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची कसून तपासणी केली जात आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १ जुलै पासून ७५ बसेसची तपासणी केली असून दोषी आढळलेल्या ३५ बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-सांगली: आटपाडी बाजारात ड्रॅगन फ्रूटला किलोला १२१ रुपयांचा भाव

तपासणी दरम्यान, चालक-मालक व प्रवाशी यांना मार्गदर्शन व प्रबोधन केले जात आहे. वाहन चालकास मार्गिका बदलचे नियम, चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग न करणे, मद्यप्राशन न करणे, आग विझवणारी उपकरणे व प्रथम उपचार पेटी सुस्थितीत ठेवणे, घाट मार्गामध्ये वाहन चालवताना वाहन न्यूट्रल न करणे, वाहन चालकाला सलग तीन तासाच्या प्रवासानंतर विश्रांतीची गरज, वेगमर्यादेचे पालन, आपत्कालीन दरवाजाचा वापर आदी बाबीही सांगण्यात येत आहेत.

खाजगी बसेसच्या चालक व मालक यांनी वाहतूकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपल्या बसेस तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against 35 private buses flouting the rules mrj
First published on: 18-07-2023 at 18:40 IST