महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी सायंकाळी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. राज सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी १ सप्टेंबर रोजी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातही सुरु आहेत. याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख शिवसेनेला संपवायला निघालेले छुपे हात असा केला आहे.

नक्की पाहा >> Photos : मध्यरात्री ‘मातोश्री’वरुन फडणवीसांचा फोन, अडीच मिनिटांची बंद खोलीतील भेट अन्…; अमित शाहांनी सांगितला युती तुटल्याचा घटनाक्रम

नवी मुंबईमध्ये गणपती दर्शनासाठी आलेल्या आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गणपतीनिमित्त दर्शनसाठी फिरत आहात. कसा प्रतिसाद आहे? या प्रश्नालाही आदित्य यांनी उत्तर देताना गणपतीबरोबरच कठीण काळात पाठीशी उभं राहणाऱ्या कार्यकर्त्यांचं दर्शन करायला आलो आहे असं म्हटलं. “मी लहानपणापासून वडिलांसोबत फिरत होतो. शंभरहून अधिक गणपतींचं दर्शन घेतलं आहे. आज नवी मुंबईमध्ये आलो आहे दर्शनसाठी. गणपती बाप्पाचं दर्शन आणि जे शिवसैनिक कठीण काळात आमच्यासोबत उभे राहिले त्याचं देखील दर्शन घ्यायला आज मी मुंबईत आलो आहे,” असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> राज ठाकरेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? मनसेसोबत युती झाल्यास पुढील प्लॅन काय? CM शिंदे म्हणाले, “राज ठाकरेंवर जेव्हा…”

त्याचप्रमाणे आदित्य यांना “मनसे आणि शिंदे गटाची युती होताना दिसत आहे किंवा त्यासंदर्भात त्यांची पावलं पडत असल्याचं दिसत आहे” असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या युतीसंदर्भातील चर्चा खऱ्याही असू शकता आणि खोट्याही असं विधान करतानाच मनसेला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला.

नक्की वाचा >> शाहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “ती जमीन दाखवल्यानंतर…”; दोन शब्दांत शिंदे गटालाही टोला

“मनसे आणि शिंदे गट युती होताना दिसत आहे” या पत्रकाराच्या विधानावर आदित्य यांनी, “चांगलं आहे. जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते चेहरे दिसत आहेत. एक एक करुन देत पुढे येत आहेत,” असं म्हटलं. तर पुढे शिंदे गट आणि मनसे युतीबद्दल, “हे खरंही असू शकतं खोटंही असू शकतं. पण छुपे हात पुढे येत आहेत,” असं म्हणत टोला लागवला.

नक्की वाचा >> “शिंदे गट आणि मनसे एकत्र…”; BMC Election संदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकताच फडणवीस हसत म्हणाले, “मला खूप मजा येते जेव्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दसरा मेळाव्यासंदर्भात काय म्हणाल? असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “त्यात म्हणणं काय आहे? शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होतो. महाराष्ट्रात याप्रकारचं गलिच्छ राजकारण मी पाहिलेलं नाही. महाराष्ट्रात यापूर्वी असं काही घडलेलं नाही आणि पुढेही होणार नाही.
सध्या जे सुरु आहे कोणालाही पटणारं नाही,” असं उत्तर दिलं.