मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेली पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने काल (२० एप्रिल) फेटाळून लावली. याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढची दिशा ठरवण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलवली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसंच, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >> सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळली, विनोद पाटलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले…

“मंत्रिमंडळाची मराठा आरक्षण उपसमिती आहे. या उपसमितीची तातडीची बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे. काल सर्वोच्च न्यायालायने पूनर्विचार याचिकेवर निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. मराठा आरक्षण उपसमितीप्रमुख चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन, रवी चव्हाण आणि मी असे उपसमितीच्या सदस्यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व दौरे रद्द करून मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे. दुपारी १ च्या सुमारास बैठक होईल”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा >> मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ज्यावेळी सरकारने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोणत्याही परिस्थिती हे टिकवायचंच. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. याकरता माजी न्यायमूर्ती भोसले आणि माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्यासह बाकीच्या लोकांशी चर्चा करण्याची जबाबदारी आम्हा मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ताबडतोब फेरविचार याचिका करायची का की काही याबाबत या बैठकीत ठरवण्यात येणार आहे”, असे शंभूराज देसाई म्हणाले.