औरंगाबादमधील ५७.२२ हेक्टर जमीन अजूनही शिल्लक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद जिल्ह्यतील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील अजिंठा प्रोजेक्ट या कंपनीला दिलेली १० हेक्टर जमीन विशेष आर्थिक क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय औद्योगिक विकास मंडळाने घेतला आहे. त्यासाठीचा पहिला पंचनामा पूर्ण झाला आहे. या कंपनीला देण्यात आलेल्या १०० हेक्टर जमिनीपैकी काही जमिनीचा ताबा शेतकऱ्यांना परत द्यावा लागला असल्याने विनाअधिसूचित करण्यास पूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. आता शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील ५३.०९ हेक्टर जमीन विशेष आर्थिक क्षेत्रातून वगळण्यात आली आहे. औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये अजूनही ५७.२२ हेक्टर जमीन विशेष आर्थिक क्षेत्रासाठी शिल्लक आहे. निर्यातक्षम उत्पादनाबरोबरच इतर व्यावसायिक दालने उभी करता येतील यासाठी शंभर हेक्टपर्यंत जमीन देण्याची तरतूद विशेष आर्थिक क्षेत्रात होती. यातील बहुतांश जमिनी उद्योजक घेतात, पण त्या वापरतच नाहीत, असा आरोप होता. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात सात कंपन्यांना एसईझेडमध्ये जमिनी देण्यात आल्या होत्या. त्यातील धूत ट्रान्समिशनने २०१३ मध्ये ३२ हजार चौरस मीटर जागा घेतली होती. अन्य तीन विशेष आर्थिक क्षेत्रावर उत्पादन सुरू झाल्याचे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture in maharashtra
First published on: 01-08-2018 at 01:14 IST