जामखेड तालुक्यातील जवळके येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यामध्ये चंदनाचा साठा सापडला आहे. या प्रकरणी काका वर्धमान वाळुंजकर राहणार जवळके तालुका जामखेड या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चंदनतस्करास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून दोन दिवसांची वन कस्टडी सुनावली आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी दिली.

जामखेड तालुक्यातील जवळके येथे चंदनाची तस्करी होत असून चंदनाचा साठा असले बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गोपनिय माहिती मिळाली होती. अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गशनाखाली राहुरीचे सहा. वनसंरक्षक गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे, वनमजुर राघु सुरवसे, शिवाजी चिलघर यांच्यासह पथक जामखेड तालुक्यातील जवळके याठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले. छापा टाकण्यापूर्वी खात्री करण्यासाठी बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. आणि यानंतर पथकान छापा टाकला. या छाप्यामध्ये ३५ गोण्या ढलप्या व सालपट, चंदनाच्या गाभ्याचा १ तुकड़ा (वजन १.४ किलो), वाकास-३, तराजु-१, एक मोबाईल व मोटारसायकल असा मुद्देमाल आढळून आला. यानंतर आरोपी काका वर्धमान वाळुंजकर याला ताब्यात घेत त्याच्यावर
भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२,५१,५२,६९ व महाराष्ट्र वननियमावली २०१४ नियम क्र. ३१५५ अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीस ज्युडिशियल मॅजीस्टूट प्रथम वर्ग-१ जामखेड ता-जामखेड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची वनकस्टडी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्याबाबत अथवा वन विषयक गुन्हे घड़त आसतील किंवा चंदन तस्करी संदर्भात काही माहीती असल्यास वनपरिक्षेत्र कार्यालय कर्जत/वनपरिमंडळ कार्यालय जामखेड यांच्याशी त्वरीत संपर्क नागरिकांनी करावा. – मोहन शेळके वनपरिक्षेत्राधिकारी कर्जत वन परिमंडळ