नाशिकमध्ये एअर इंडियाच्या महिला वैमानिकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत त्या आढळल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. रश्मी गायधनी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात असून खळबळ माजली आहे. गॅस गिझरमधून वायू गळती झाल्यामुळे रश्मी मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पोलीस मात्र गॅसगळती नसावी असं सांगत असून याप्रकरणी तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्मी गायधनी एअर इंडियामध्ये वरिष्ठ वैमानिक होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच गुदमरुन रश्मी गायधनी यांना यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. रश्मी गायधनी यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india woman pilot rashmi gaydhani found dead in nashik sgy
First published on: 07-02-2022 at 14:52 IST