महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार काल पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुलेऐवजी सावित्रीबाई होळकर असं म्हटलं. संबंधित कार्यक्रमातला व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला. तसेच अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व घडामोडीनंतर शनिवारी अजित पवारांनी आपल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. आपल्याकडून बोलण्याच्या ओघात ती चूक झाली, असं व्हायला नको होतं, असं अजित पवारांनी म्हटलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

हेही वाचा- “…तेव्हापासून मी संसदेत जायला घाबरतो”; शरद पवारांनी सांगितलं कारण, PM मोदींच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख करत म्हणाले…

संबंधित विधानावर दिलगिरी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “कधी-कधी बोलण्याच्या ओघात माणसाकडून चूकभूल होते. पण प्रसारमाध्यमांमध्ये याचा एवढा मोठा गवगवा केला जातो. मी सावित्रीबाई फुले यांना चुकून सावित्रीबाई होळकर म्हणालो, यामध्ये मी असा काय मोठा गुन्हा केला होता. ज्यामुळे अनेकांचं आकाश पाताळ एक झालं… खरं तर, मी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय, त्यामुळे माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. परंतु बोलण्याच्या ओघात चूक झाली.”

हेही वाचा- “शाळिग्राम नावाच्या माकडाने…”, तुषार भोसलेंचा ‘झाकणझुल्या’ उल्लेख करत मिटकरींची जोरदार टीका

“मी आहिल्याबाई होळकरांनाही तसंच बोललो आणि सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख फुले म्हणण्याऐवजी होळकर असा केला. माझी चूक लक्षात आल्यानंतर मी लगेच दिलगिरीही व्यक्त केली. जिथे आपल्याकडून चूक होते, तिथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायचं असतं, असं आपल्याला वडिलधाऱ्यांनी शिकवलं आहे. यामुळे कुणाचं काही बिघडत नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar apologized for wrong pronounced savitribai holkar instead of phule rmm
First published on: 07-01-2023 at 15:48 IST