विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना खोचक टोला लगावला. “देशात आता राज्यापालांच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र, राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं काम उल्लेखनीय होतं”, असं ते म्हणाले.

हेही वाचा शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संजय बांगर यांना एकनाथ शिंदेंकडून समज, म्हणाले “तुमचा मुद्दा…”

“द्रौपदी मुर्मू यांनी १८ मे २०१५ रोजी झारखंडच्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली. ६ वर्ष, १ महिना आणि १८ दिवस त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. तसेच त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या, ज्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पदावरून हटवण्यात आलं नव्हतं. त्यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखलं जातं. सद्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता. आज अनेक राज्यपालांच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र, राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं काम उल्लेखनीय होतं”, असं ते म्हणाले.

“द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल पदाच्या काळात त्यांनी घेतलेली भूमिका चर्चेत राहिल्या. आधीचं रघुबर दास सरकार असेल किंवा सध्याचं हेमंत सोरेन सरकार असेल, दोन्ही सरकारांनी घेतलेले निर्णय पुर्नविचारासाठी पाठवण्याची भूमिका त्यांनी घेतली. तसेच या काद्यांमुळे आदिवासींना काय फायदा होणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

“एकंदरीतच द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ हा संघर्षाने भरलेला होता. त्यांच्या जन्मापासून ते राष्ट्रपदी पदापर्यंतचा प्रवास बघितला, तर संघर्ष काय असतो आणि त्याचा सामना कसा करायचा असतो, हे शिकता येईन”, असेही ते म्हणाले.