Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यात जुलै २०२३ पासून फूट पडली आहे. कारण ४१ आमदार घेऊन अजित पवार बाजूला झाले आणि सत्तेत सहभागी झाले. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातलं वैर महाराष्ट्राच्या समोर आलं. त्यानंतर काही कालावधीने लोकसभा निवडणूकही पार पडली. मात्र त्यावेळी सुप्रिया सुळे निवडून आल्या. आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना शरद पवारांसह तुम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र याल का? हे विचारलं असता अजित पवारांनी ( Ajit Pawar ) त्यावर उत्तर दिलं आहे. लोकसभेला पराभव का झाला ते देखील सांगितलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

लोकसभेत पराभव का झाला हे विचारलं असता अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीकरांनी शरद पवारांच्या वयाचा विचार केला. शरद पवारांची मुलगी उभी आहे म्हणून मतदान केलं. तसंच संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण जाणार म्हणून ४०० पार जायचं आहे हे फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं. या फेक नरेटिव्हचा फटका बसला. खोट्या बातम्यांचा आधार घेऊन हे नरेटिव्ह तयार केलं गेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला नमस्कार करतात, आम्ही न्यायदेवतेची प्रतिमाही बदलली. कारण असं काहीही होणार नाही. त्यामुळे लोकांना आता सत्य समजलं आहे.” असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले.

हे पण वाचा- Ajit Pawar : अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगांसह जेवणाचा डबाही तपासला, VIDEO शेअर करत म्हणाले…

बारामतीत आत्ताची परिस्थिती वेगळी आहे

बारामतीत आत्ताची परिस्थिती ही लोकसभेच्या वेळेपेक्षा वेगळी आहे. लोकसभेच्या वेळी लोकांनी ठरवलं होतं की अजित पवार कामाचा माणूस असला तरीही शरद पवारांबरोबर जायचं हे लोकांनी ठरवलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा विजय झाला. आता विधानसभेला ते चित्र दिसणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अजित पवार यांनी हे विधान केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांसह राजकीयदृष्ट्या एकत्र याल का?

शरद पवारांसह एकत्र याल का? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, ” आज तरी आम्ही दोघांनी वेगळे मार्ग निवडले आहेत. त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे आजच त्या संदर्भात बोलणं, सूतोवाच करणं योग्य नाही. सहा दिवस निवडणुकीला राहिले आहेत. आम्हाला १७५ जागा निवडून आणायच्या आहेत. सगळेजण तयारीला लागले आहेत. अशा वेळेस कुठल्याही प्रश्नाला उत्तर ब्रेकिंग न्यूज देऊन, मित्र पक्षांमध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा नाही.” असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी स्पष्ट केलं.