राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्याच्या टिंबर मार्केटला भेट दिली. तिथे लागलेल्या आगीनंतर मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं. त्याची पाहणी अजित पवारांनी आज केली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. यावेळी इतर कोणतीही राजकीय भूमिका मांडण्यास त्यांनी नकार दिला असला, तरी राज्यातील आगामी निवडणुकीबाबत त्यांनी यावेळी मोठं विधान केलं आहे.

आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक?

अजित पवार आज रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी पुण्यात हजर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचीही महत्त्वपू्र्ण बैठक आयोजित करण्यात आल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. “कसली राष्ट्रवादीची बैठक, कोण सांगतं तुम्हाला? तुम्हाला ही धादांत खोटी माहिती मिळाली आहे. अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. रयत शिक्षण संस्थेच्या तीन वर्षांसाठी नेमणुका होतात. वेगवेगळ्या विभागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आहेत. त्यासाठीची बैठक आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“नेतेमंडळींच्या वक्तव्यांचा दर्जा खालावला”

दरम्यान, एकीकडे राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार देतानाच अजित पवारांनी सध्या नेतेमंडळींकडून देण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका केली. “सध्या काही जण हलक्या दर्जाची विधानं करतात. दर्जाहीन वक्यव्य करतात. याचा खरंतर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा”, असं ते म्हणाले.

“भाजपाच्या सर्वेनुसार शिंदे गटातला एकही खासदार…”, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा; म्हणाले, “गजानन कीर्तिकरांना समजलंय…”

राजू शेट्टींच्या विधानावर सूचक प्रतिक्रिया

राजू शेट्टी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका मांडल्यासंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर सूचक विधान केलं. “राजू शेट्टी म्हणाले मी स्वतंत्र उभा राहणार, ६ लोक उभे करेन. प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतंय. सगळ्यांना जे काही बोलायचंय ते बोलू द्या. निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच हे सगळं स्पष्ट होईल”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात पोटनिवडणूक लागणार?

दरम्यान, पुण्यातील कसबापेठ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवली. “मला एक बातमी अशीही कळली आहे. मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातली माहिती आहे”, असं अजित पवार म्हणाले.