राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात आमदार मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. या अपघातानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपलं नाव ‘कानफाट्या’ का पडलं? याचं कारण सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलते होते.

यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्या अपघाताविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा परळीत अपघात झाला आहे. त्यांच्या दोन बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे ते मुंबईत येणार आहेत. मुंबईत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर मीही त्यांना भेटायला जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हेही वाचा- “छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणावं हीच माझी भूमिका पण धर्मवीर…” अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांच्या होणाऱ्या अपघातावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, मी याआधीही सांगितलं आहे की, रात्री-अपरात्री प्रवास करू नका. जे काही फिरायचंय आहे, ते सकाळी सहा ते रात्री अकराच्या दरम्यान फिरावं. रात्री अकरानंतर थोडं थांबावं, झोप काढावी, त्यानंतर पहाटे सहा वाजता वगैरे प्रवासासाठी निघावं. थोडा उशीर झाला तर काय बिघडतं. कारण याच मधल्या काळात जास्त अपघात घडतात. शेवटी चालकही माणूसच असतो. सगळ्यांनाच दम देऊन आपलं नाव कानफाट्या पडलंय, आता कुणा-कुणाला दम देऊ…, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अजित पवारांनी ‘धर्मवीर की स्वराज्य रक्षक’ या वादावर भाष्य केलं. ते आपल्या विधानावर ठाम राहिले. याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोकं आहेत ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.